ॐकार स्वरूपा… ३
तुज नमाे… ३
ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था, २
अनाथांच्या नाथा तुज नमाे …३
नमाे मायबापा, गुरु कृपाघना
ताेडिया बन्धना माया माेहा
माेहजाल माझे, काेण निरशील
तुजवीण दयाळा, सद्गुरुराया
तुज नमाे ….३ ॐकार स्वरूपा … ॥१॥
सद्गुरुराया माझा, आनन्द सागर
त्रैलाेक्या आधार, गुरूराव …३
गुरूराव स्वामी, असे स्वयं-प्रकाश … आ आ आ २
ज्यापुढे उदास, चन्द्र रवी …३
रवी, शशी, अग्नी, नेणति ज्या रूपा
स्वप्रकाशरूपा, नेणे वेद …३
तुज नमाे … ५ ॥२॥
एका जनार्दनी, गुरु परब्रह्म
तयाचे पै नाम, सदा मुखी
तुज नमाे … ५ ॐ कार स्वरूपा …