अबीर गुलाल उधळीत रंग …. (3)
नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग ॥

उंबरठ्याशी कैसे शिवू, आम्ही जातिहीन, रूप तुझे कैसे पाहू,
दास आम्ही दीन….. (2)

वाळवंटी गावू आम्ही, वाळवंटी नाचू … (2)
चन्द्रभागेच्या पाण्यानं, अंग अंग न्हाऊ … (2)

निर्मलाचे / विठ्ठलाचे नाम घेऊ, हाेवूनी नि:संग ॥ नाथा घरी नाचे …

आषाढी कार्तिकी, भक्तजन येती….. (2)
पंढरीच्या वाळवंटी, संत गाेळा हाेती…. (2)

चाेखा म्हणेे नाम घेता, भक्त हाेती दंग ॥ नाथा घरी नाचे …